पुणे - ‘पशुसंवर्धन विभाग ग्रामीण आणि शहरी भागाशी निगडित आहे. हा उद्योजकांचा विभाग आहे. यामध्ये डेअरी, फिशरी, पोल्ट्री आदी व्यवसायांचा संबंध येतो. तरीही हा विभाग थोडा दुर्लक्षित आहे. .तो जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी आणि ग्रामीण भागात उद्योजक निर्माण करण्यासाठी लवकरच योजना आणणार आहोत,’ अशी घोषणा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केली..पुण्यात पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यास गुरुवारी (ता. १५) सुरुवात झाली. या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुंडे बोलत होत्या. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे उपस्थित होते..मुंडे म्हणाल्या, ‘योजनेचा मसुदा तयार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना योजनेबद्दल माहिती दिली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर योजना जाहीर होईल. पशुसंवर्धन विभागातील ज्या अधिकाऱ्यांचे पद, ऐपत आणि आमदार, खासदारांच्या ओळखी आहेत, अशाच अधिकाऱ्यांच्या बदल्या मागेल तिथे होत होत्या..मात्र, आता सर्वांना समान अधिकार मिळणार असून समुपदेशनाने बदल्या होणार आहेत. यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही. तसेच, बदल्यांचा हा पॅटर्न कायम ठेवणार आहे. पशुसंवर्धन विभागातील वर्ग एकच्या बदल्यांसाठी समुपदेशन घेण्यात आले. यामध्ये ऑनलाइन पद्धतीने आणि शासनाच्या धोरणानुसार प्राधान्यक्रम ठरविला. यामध्ये बदलीपात्र अधिकाऱ्यांचे समुपदेशन करून ५५० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.