
पुणे : काँग्रेसचे नेते आमच्या संपर्कात आहेत, त्यांना भाजपमध्ये यायचे आहे. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नो रूम अॅव्हेलेबल, हाऊसफुल असा बोर्ड लावला आहे. हा बोर्ड योग्य वेळी तो काढला जाईल,’’ अशा शब्दात सध्या भाजपमध्ये कोणाचाही प्रवेश होणार नसल्याचा दावा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
मुनगंटीवार हे पुण्यात आले असता त्यांनी पत्रकारांनी संवाद साधला. ‘‘काँग्रेसमधील अनेक नेत्यांशी बोलणं झालं आहे. काँग्रेसचे नेते अधूनमधून भेटत असतात, असे सांगत मुनगंटीवार यांनी ‘‘काँग्रेसच्या एका नेत्याने सांगावं की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असे आव्हान दिले.
मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. हा प्रश्न मला विचारणे म्हणजे फिजिक्सच्या विषयाला केमिस्ट्रीचा पेपर कसा येईल?. मी अजून मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न केलेला नाही. मी माझ्या खात्याचं काम करतोय. कार्यकर्ता म्हणून जनतेचे काम करण्यात आम्हाला आनंद आहे.’
महायुतीसरकार शेतकऱ्यांना मदत करत आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात ठाकरे यांनी केवळ मदतीची घोषणा केली. पण आम्ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. अजून काही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, ती लवकरच सरकारकडून दिली जाईल.
आपला देश अर्थव्यवस्थेत प्रगती करतोय. आज आपली पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था आली आहे. जर्मनी आणि जपान हे दोन्ही देश आपल्यामागे जाऊ शकतात. यामध्ये आपल्या राज्याचा वाटा खूप मोठा आहे, असे ही मुनगंटीवार यांनी सांगितले.
वनरक्षक परिक्षेत पेपर फोडला गेला नाही, जो फुटला असे सांगितले तो बनावट होता. समाजामध्ये काही लोक फसविणारे असतात, त्यामुळे अशा लोकांपासून विद्यार्थ्यांनी सावध राहिले पाहिजे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.
पक्ष प्रवेशावरून भाजप नेत्यांच्या भिन्न भूमिका
गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत ‘‘आमचे भाजपचे उपरणे तयार आहे, कोणाला पक्षात यायचे असेल तर सांगा’’ असे जाहीर आवाहन केले होते. पण त्यानंतर आता मुनगंटीवार यांनी ‘‘फडणवीस यांनी हाऊसफुलचा बोर्ड लावला आहे असे सांगत पक्षप्रवेश केले जाणार नाहीत असे सांगितले. त्यामुळे भाजप नेत्यांच्या दोन भूमिका समोर आल्या आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.