

पुणे, ता. १३ ः अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणात हडपसर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तपास पूर्ण करून, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध पॉक्स कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही घटना ११ मे रोजी माळवाडीतील साधना विद्यालयाजवळ घडली होती. अल्पवयीन मुलगी खेळत असताना ती एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी मसा दशरथ राजगुरू (वय ३२, रा. सैफुल, ता. सोलापूर) याने तिच्याशी गैरवर्तन केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपीला हडपसर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.