दौंड रेल्वे मालधक्क्यात अल्पवयीन चालक ठार  

प्रफुल्ल भंडारी
Tuesday, 12 January 2021

दौंड रेल्वे मालधक्क्यात मालगाडीतून ट्रॅक्टर उतरवत असताना ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने एका अल्पवयीन चालकाचा जागीच मृत्यू झाला.

दौंड : दौंड रेल्वे मालधक्क्यात मालगाडीतून ट्रॅक्टर उतरवत असताना ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने एका अल्पवयीन चालकाचा जागीच मृत्यू झाला. अल्पवयीन चालकास जोखीमच्या कामासाठी नियुक्त करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

"सीरम'ला लसीची पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार

दौंड लोहमार्ग पोलिसांनी या बाबत माहिती दिली. अमोल सदाशिव घोलवड (वय १६, रा. अजनुज, ता. श्रीगोंदा, जि. नगर) असे मृत चालकाचे नाव आहे. ११ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता हा दुर्देवी प्रकार घडला. मालगाडीतून स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर उतरवत असताना अमोल घोलवड याचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने तो खाली लोहमार्गावर पडला व सदर ट्रॅक्टरचे पाठीमागील चाक त्याच्या छातीवरून गेल्याने त्याच्या मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या बाबत रेल्वे स्थानकाचे उपव्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अमोल याच्या पार्थिवाचे दौंड उप जिल्हा रूग्णालयात विच्छेदन करण्यात आले आहे. फौजदार ताराचंद सुडगे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सदर प्रकरणी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज कलकुटगे यांनी दिली. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minor driver killed at daund