Baramati Crime : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप; पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी आरोपी वडिलांना बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
crime

crime

Esakal 

Updated on: 

बारामती - स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी आरोपी वडिलांना बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी शुक्रवारी (ता. १६) हा निकाल दिला. तसेच पीडितेला पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com