
दौंड : आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे चारचाकी वाहनातून निघालेल्या भजनी मंडळातील एका अल्पवयीन मुलीवर स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे ३० जून रोजी अत्याचार आणि तिच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तीन महिलांच्या अंगावरील दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने शस्त्र दाखवून लुटण्यात आले होते. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांची कोठडीत रवानगी केली आहे.