Theur Kidnapping : देव दर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी गेलेल्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून नेल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली.
Kidnapping

Kidnapping

sakal

Updated on

- सुनील जगताप

थेऊर - महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी गेलेल्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून नेल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात घडली असून, रविवारी (ता. १५) संध्याकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com