

वेल्हे, (पुणे) - राजगड तालुक्यातील वाजंळे गावात घरात एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा प्रकार घडला असून याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात बुधवार (ता. 12) रोजी गुन्हा दाखल झाला असून, आरोपीस न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी दिली.
या प्रकरणी आरोपी संजय सोपान धरपाळे (रा. वाजंळे) याच्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.