
प्रफुल्ल भंडारी
दौंड : आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे चारचाकी वाहनातून निघालेल्या भजनी मंडळातील एका अल्पवयीन मुलीवर दाजी व मेहुण्याच्या जोडीने अत्याचार केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. दोघांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी याबाबत माहिती दिली.