
पुणे : एका बांगलादेशी अल्पवयीन मुलीला कुंटणखान्यात डांबून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. परंतु मुलीने त्यास नकार दिल्याने तिला पट्ट्याने मारहाण करण्यात आली. याबाबत सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाल्यानंतर सहकारनगर पोलिसांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली.