परदेशी शिक्षणासाठी ६८ विद्यार्थ्यांची निवड

परदेशी शिक्षणासाठी ६८ विद्यार्थ्यांची निवड
Published on

लोगो - अल्पसंख्याक शिष्यवृत्ती

पुणे, ता. ११ : राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी पात्र ६८ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. हे विद्यार्थी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्रिटन आणि अमेरिका यांसारख्या देशांतील नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणार आहेत.
परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीबाबतचा अध्यादेश अल्पसंख्याक विभागाने प्रसिद्ध केला आहे. या योजनेअंतर्गत क्यूएस क्रमवारीतील पहिल्या दोनशे विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी १७ जूनला जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर ३१ जुलैला छाननी प्रक्रिया पूर्ण करून ६८ विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात आली. यात ६५ पदव्युत्तर पदवी आणि तीन पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवीसाठी निवडलेल्या अभ्यासक्रमांमध्ये संगणक अभियांत्रिकी, पर्यावरण अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मेकॅनिकल, स्थापत्य, जैववैद्यकीय अभियांत्रिकी, मानसशास्त्र, उपयोजित कला, विधी, वाणिज्य, कृषी, कृषी अर्थव्यवस्था अशा विषयांचा समावेश आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विभागाने दिली आहे.
पात्र विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करून त्यांना शिष्यवृत्ती लागू केली जाईल. शिक्षण शुल्कातील बदलांबाबतचे अधिकार अल्पसंख्याक आयुक्तांकडे असतील. शिक्षण पूर्ण झाल्यावर देशाची सेवा करण्याचे हमीपत्र देणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे आवश्यक असून, विद्यापीठ किंवा अभ्यासक्रम परस्पर बदलल्यास शिष्यवृत्तीची संपूर्ण रक्कम वसूल केली जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com