
बारामती : देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय रविवारी (ता. 6) बारामतीत एका कुटुंबाला आला. तालुक्यातील झारगडवाडी येथील एका दीड वर्षीय बालकांच्या मानेमध्ये उसतोडीचा कोयता घुसला होता. खेळता खेळता कोयत्यावर पडल्याने या बालकाच्या मानेमध्ये हा कोयता घुसला होता.