Private Bus Fire
sakal
शिरूर - पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे महागणपती मंदिरासमोर आज रात्री साडेआठच्या सुमारास चालत्या खासगी बसने पेट घेतल्याने खळबळ उडाली. बसचालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्यावरून खाली घेतली व सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवून घेतल्याने मोठी जिवीतहानी टळली.