मिरज सिव्हिल प्रवेशद्वाराची कमान कोसळली; सात कामगार जखमी

मिरज सिव्हिल प्रवेशद्वाराची कमान
कोसळली; सात कामगार जखमी
Published on

मिरजेत कमान कोसळल्याने
सात कामगार जखमी
मिरज, ता. २१: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापाशी उभारण्यात येणाऱ्या कमानीच्या वरील बाजूचा स्लॅब सोमवारी दुपारी अचानक कोसळला. याखाली सात कामगार दबले गेले. मात्र तातडने हालचाल करून सातही जणांना ढिगाऱ्याखालून सुरक्षितपणे बाहेर काढले. जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर विशेष अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मिरज शासकीय रुग्णालयाच्या परिसरात संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीचे दोन्ही बाजूंचे खांब उभारण्यात आले असून वरील बाजूच्या स्लॅबचे काम सुरू होते. स्लॅबला स्टील सेंट्रींग करून लाकडी खांबांचा आधार देण्यात आला होता. त्यावर काँक्रीट टाकण्याचे काम सुरू असतानाच अचानक सेंट्रींगसह काँक्रीटचा भाग कोसळला. या वेळी तेथे काम करणारे सात कामगार अडकले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.
विशेष अतिदक्षता विभागाची व्यवस्था
जखमी कामगारांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने युद्धपातळीवर वैद्यकीय यंत्रणा सज्ज केली. सातही कामगारांसाठी विशेष अतिदक्षता विभागाची व्यवस्था करण्यात आली. त्यापैकी एका कामगाराच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असून, दुसऱ्या कामगाराच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अन्य कामगारांनाही दुखापती झाल्या आहेत. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिस व रुग्णालय प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com