Pune News : हरवलेली मुलगी वारजे पोलिसांच्या मदतीने आईच्या कुशीत

तीन वर्षाची मुलगी वारजे माळवाडी येथील यशोदीप चौकामध्ये बराच वेळ इकडे तिकडे फिरत होती. मात्र तिला आपले घर सापडत नव्हते.
Tannu Rao
Tannu RaoSakal

वारजे - एक तीन वर्षाची मुलगी वारजे माळवाडी येथील यशोदीप चौकामध्ये बराच वेळ इकडे तिकडे फिरत होती. मात्र तिला आपले घर सापडत नव्हते. पोलिसांना याची माहिती मिळताच मुलीला कडेवर घेऊन माळवाडी परिसरात पालकांचा शोध घेऊन मुलीला पालकांच्या स्वाधीन केले.

त्यांचे झाले असे वारजे माळवाडी येथील यशोदीप चौकात एक तीन वर्षाची मुलगी एकटीच इकडे - तिकडे करत होती. तेव्हा येथेच असलेल्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका गौरी पवार यांनी वारजे पोलिसांना तशी माहिती दिली.

ही तीन वर्षाची मुलगी बराच वेळ झाली एकटीच फिरत असून एका महिलेने या मुलीस आमच्या शाळेमध्ये आणून दिले आहे. अशी माहिती पोलिसांना दिली. माहिती कळताच पोलीस अंमलदार अंकिता मोहोळ, अबोली केंद्रे आणि संजय निगडे यांनी तात्काळ सदर मुलीला ताब्यात घेतले आणि हे पोलीस येथील वारजे माळवाडी मध्ये या मुलीच्या पालकांचा शोध घेऊ लागले.

अधिक विचारपूस केली असता मुलीने तिचे वडील टेलर असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी झोपडपट्टीच्या दिशेने टेलरचे दुकान शोधायला सुरुवात केली. याचवेळी एका स्कूल गाडीच्या चालकाने ही मुलगी वारजे माळवाडी येथील स्मिता पाटील विद्यालयातील असून सदर मुलीचा तेथील कर्मचारीही शोध घेत आहे. अशी माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी लगेचच वारजे माळवाडी येथील यशोदीप चौकातील स्मिता पाटील विद्यालय गाठले. आणि सदर मुलीची ओळख पटवली. तन्नू अनिल राव - (वय वर्ष 3, रा. सहयोग नगर, वारजे माळवाडी) हिला तिची आई नीतू अनिल राव हिच्या ताब्यात देण्यात आले. तन्नू हिने याच शाळेत दोन दिवसांपूर्वी प्रवेश घेतला होता. तिने शिक्षकांचा व कर्मचाऱ्यांचा डोळा चुकून शाळेतून निघून गेली. त्यामुळे शिक्षकही तिचा तपास करत होते.

मात्र पोलिसांनी तिला शाळेत आणल्यानंतर सदर मुलीला तिच्या आईची ओळख पटवून तिचा स्वाधीन केले. यावेळी स्मिता पाटील विद्यालयाच्या प्रमुख संजीवनी पाटील उपस्थित होत्या. तसेच लहान मुलांची शाळेने काळजी घेणे गरजेची आहे अशी ताकीद पोलिसांनी शाळेला दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com