वाई:-गहाळ झालेला''राणीहार'' शोधून वाई पोलिसांनी मूळ मालकास केला सुपूर्त.
वाईत गहाळ झालेला ‘राणीहार’ मूळ मालकाकडे सुपूर्त
वाई, ता. २६ : येथील पोलिसांनी गहाळ झालेला अडीच तोळ्यांचा सोन्याचा राणीहार शोध घेऊन मालकास सुपूर्त केला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महेश मोहिते (रा. गंगापुरी वाई) यांच्या पत्नीचा १ फेब्रुवारीला अडीच तोळ्यांचा राणीहार गहाळ झाला असल्याचा तक्रार अर्ज पोलिस ठाण्यात दाखल केला होता. या अर्जाची दखल घेऊन पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी हा गहाळ दागिन्याचा शोध घेण्याच्या सूचना संबंधित तपासी अंमलदार यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस अंमलदार विक्रम धोत्रे यांनी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन हा गहाळ दागिन्याचा शोध घेतला. त्या वेळी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता दागिन्यांची पर्स असलेली पिशवी गंगापुरीत एका रस्त्यावर पडल्याचे आढळून आले. याबाबतची खात्री केल्यानंतर हे दागिने सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी, उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांच्या उपस्थितीत तक्रारदार यांना सुपूर्त केले. त्याबद्दल त्यांनी पोलिस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांचे आभार मानले.
------
07631
वाई : गहाळ झालेले सोन्याचे दागिने अर्जदारास देताना अमोल गवळी, सुधीर वाळुंज, विक्रम धोत्रे व इतर सहकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

