

सर्व मालवाहू वाहनांना मनाई
‘मिसिंग लिंक’वर एक नोव्हेंबरपासून नियम लागू
पुणे, ता. २६ : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’वर आता सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना प्रवास करण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.
‘मिसिंग लिंक’वरील सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी नवीन वाहतूक अधिसूचना जारी केली असून, ‘मिसिंग लिंक’वरून सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना जाण्यास कायमस्वरूपी मनाई केली आहे. हे नवीन नियम एक नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. बोगद्यांची रचना आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नवीन बदल
- यापूर्वी परवानगी असलेल्या ‘पिकअप व्हॅन’सारख्या हलक्या मालवाहू वाहनांनाही आता बंदी असेल.
- कोणत्याही प्रकारच्या मालवाहू वाहनाला या मार्गावरून जाता येणार नाही.
- ज्वलनशील, स्फोटक किंवा धोकादायक पदार्थांच्या वाहतुकीला सक्त मनाई आहे.
- प्रतिबंधित वाहनांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या जुन्या मार्गिकेचा वापर करणे बंधनकारक आहे.
प्रवासी वाहनांना परवानगी
- खासगी कार, जीप आणि बिगर-वाहतूक हलकी वाहने येथून प्रवास करू शकतात.
- प्रवासी बस आणि इतर प्रवासी वाहनांना या मार्गाचा वापर करता येईल.
- हलक्या वाहनांना ताशी १०० किमी, तर बसना ताशी ८० किमी वेगाची मर्यादा असेल.
‘‘पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील बोगद्यांची रचना आणि तांत्रिक बाबी लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला. या मार्गावरून सर्व प्रकारच्या मालवाहू आणि ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. एक नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होईल.’’
- शिवाजी पवार, पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस, पुणे परिक्षेत्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.