

A Mother’s Agony: Parents Demand Justice After Daughter Disappears
sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : “साहेब,आम्हाला गोळ्या घाला,जीव घ्या…पण आमची मुलगी शोधून द्या!”अशी हृदयद्रावक हाक देत कुंजीरवाडी येथील अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस कार्यालयासमोर टाहो फोडला.तब्बल दीड महिना उलटूनही मुलीचा शोध लागला नसल्याने संतप्त कुटुंबाने “पुढील दोन दिवसांत मुलगी सापडली नाही तर मुख्यमंत्री कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करू,”असा गंभीर इशारा प्रशासनाला दिला आहे.