Devkund View Point Accident : पुणे येथील हरवलेल्या अठरा वर्षाच्या तरुणाचा मृतदेह देवकुंड व्ह्यू पॉईंट दरीत आढळला
Rescue Team Retrieves Body from Tamhini Gorge : पुण्यातील अठरा वर्षीय तरुणाचा मृतदेह ताम्हिणी घाटातील देवकुंड व्ह्यू पॉईंट दरीत सापडला. पोलिस आणि रेस्क्यू टीमने अथक मेहनतीने मृतदेह बाहेर काढला.
पाली : पुणे येथील हरवलेल्या अठरा वर्षाच्या तरुणाचा मृतदेह ताम्हिणी घाटातील देवकुंड व्ह्यू पॉईंट दरीत आढळला. शनिवारी (ता. 30) रात्री आठच्या सुमारास रेस्क्यू टीम व पोलिसांनी अथक मेहनतीने या तरुणाचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढला.