जुन्नरमधील बेपत्ता विद्यार्थ्याचा पोलिसांकडून ७२ तासांत शोध

जुन्नरमधील बेपत्ता विद्यार्थ्याचा 
पोलिसांकडून ७२ तासांत शोध
Published on: 

जुन्नर, ता. २ : जुन्नर शहरातील एका नामांकित शाळेतून बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा शोध घेण्यात जुन्नर पोलिसांना यश आले आहे. दिवा (जि. ठाणे) येथून या विद्यार्थ्याला ७२ तासांच्या आत सुखरूप ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर शहरातील शाळेत शिक्षण घेणारा हा अल्पवयीन विद्यार्थी २३ सप्टेंबरला दुपारी सव्वादोनच्या सुमारास आजोबांसोबत शाळेतून बाहेर पडला होता. शाळेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका चौकात गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीने फूस लावून या विद्यार्थ्याला पळवून नेले. पालकांनी सुरुवातीला स्वतः शोध घेतला, मात्र तो न सापडल्याने अखेर २९ सप्टेंबरला जुन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
शहरात यापूर्वीही तीन विद्यार्थी बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या असल्याने पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गुंड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी तातडीने तपास यंत्रणा कार्यान्वित करून शोध पथके रवाना केली. तांत्रिक तपासाच्या आधारे हा विद्यार्थी दिवा येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आणि पालकांच्या स्वाधीन केले.
शालेय प्रशासन आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल आढळल्यास त्यांचे योग्य समुपदेशन करावे, तसेच कोणताही विद्यार्थी बेपत्ता झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक गुंड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com