Young Woman Counselling
sakal
बारामती - घरातील काही कारणांमुळे आई-वडिलांसोबत न राहता मैत्रिणीकडे जाण्याचे सांगून घरातून निघून गेलेल्या तरुणीचा बारामती शहर पोलिसांनी शोध घेऊन तिला सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे, महिला पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या संवेदनशील समुपदेशनातून तरुणीने तिच्यासोबत घडलेल्या गंभीर बाबी पोलिसांना सांगितल्या.