शहर गुन्हेगारी

शहर गुन्हेगारी
Published on

कोनापुरे चाळ परिसरातील
तरुणी सोलापुरातून बेपत्ता
सोलापूर : येथील रेल्वेलाईन परिसरातील कोनापुरे चाळ येथून एक २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. १२ जुलै रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास ती घराबाहेर पडली. घरातून जाताना तिने कोणाला काहीही सांगितले नाही. तिच्या वडिलांनी इतरत्र शोध घेतला, मोबाईलवर संपर्क साधला, मात्र ती सापडली नाही. तिच्या वडिलांनी सदर बझार पोलिसांत धाव घेतली असून पोलिस त्या तरुणीचा शोध घेत आहेत.
------------
जानेवारीत मोबाईल चोरी;
आता दिली फिर्याद
सोलापूर : येथील नई जिंदगीतील भाग्यलक्ष्मी नगरातील अब्दुलगनी अलिसाहेब शेख यांचा मोबाईल १० जानेवारीला कुमठा नाका परिसरातून चोरी झाला होता. चोरट्याने त्यांच्या शर्टच्या खिशातून मोबाईल चोरला होता. या प्रकरणी अब्दुलगनी शेख यांनी १४ जुलैला सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस हवालदार पापडे तपास करीत आहेत.
-------------
भांडणात मध्यस्थी
करणाऱ्यालाच मारहाण
सोलापूर : येथील दयानंद कॉलेजजवळील बस थांब्याजवळ अभिषेक शिवाजी सुर्वे (रा.विडी घरकूल, सोलापूर) व त्याचा मित्र भिमाशंकर अक्कलकोटे हे दोघे बोलत थांबले होते. त्यावेळी राहुल शिंगे, लक्ष्मण कांबळे (दोघेही रा. गुजर वस्ती, सोलापूर) हे कॉलेजमधील एका मुलास मारहाण करीत होते. त्यासंदर्भात अभिषेक सुर्वे याने राहुल व लक्ष्मण यांना विचारणा केली. त्यावेळी राहुल शिंगे याने शिवीगाळ, दमदाटी करून दगडाने मारहाण केली. तर लक्ष्मण कांबळे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद अभिषेक याने जोडभावी पेठ पोलिसांत दिली. १४ जुलैला दुपारी साडेचारच्या सुमारास ही मारहाण झाली. पोलिस हवालदार दुधाळे तपास करीत आहेत.
-------------------
प्रेमविवाहामुळे मानपान नाही;
पैशांसाठी विवाहितेचा छळ
सोलापूर : ‘प्रेम विवाह केल्याने तुझ्या लग्नात आमचा मानपान झाला नाही, पतीच्या व्यवसायासाठी माहेरहून पाच लाख रुपये आण’ असे म्हणून सासरच्यांनी छळ केला. शिवीगाळ करून मुलीच्या संगोपनाची जबाबदारी न घेता त्यांनी मानसिक, शारीरिक त्रास दिला. पती किरण व्हनकोरे, लक्ष्मी व्हनकोरे, वैशाली व्हनकोरे, हुसेन राम व्हनकोरे, धनश्री व्हनकोरे (सर्वजण रा. गरीबी हटाव झोपडपट्टी, सोलापूर) यांनी छळ केल्याची फिर्याद विवाहिता अंबिका व्हनकोरे यांनी सदर बझार पोलिसांत दिली. जून २०२२ ते नोव्हेंबर २०२५ या काळात त्यांनी छळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस हवालदार मोरे तपास करीत आहेत.
------------------
सोलापूर बाजार समितीत
कांद्याला ३२०० रुपये भाव
सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १५) कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी भाव १७०० रुपयांचा मिळाला. उच्चांकी दर ३२०० रुपये मिळाला. बुधवारी १२८ ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता. १२ हजार ८४० क्विंटल कांदा विक्रीतून दोन कोटी १८ लाख २८ हजार रुपयांची उलाढाल झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com