Mission Impossible Documentary : शून्य सर्पदंश प्रकल्पावर आधारित "मिशन इम्पॉसिबल" माहितीपट राष्ट्रीय स्तरावर प्रथम

१२ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या आरोग्य फिल्म महोत्सवात शून्य सर्पदंश प्रकल्पा अंतर्गत विषारी सर्पदंश उपचार व त्याचे दुष्परिणाम या माहितीवर नारायणगाव येथील विघ्नहर मेडिकल फाउंडेशनने तयार केलेल्या सीमा मुरलीधरन दिग्दर्शित " मिशन इम्पॉसिबल" या माहितीपटास राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांक मिळाला.
Mission Impossible Documentary
Mission Impossible Documentarysakal

नारायणगाव : १२ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या आरोग्य फिल्म महोत्सवात शून्य सर्पदंश प्रकल्पा अंतर्गत विषारी सर्पदंश उपचार व त्याचे दुष्परिणाम या माहितीवर नारायणगाव येथील विघ्नहर मेडिकल फाउंडेशनने तयार केलेल्या सीमा मुरलीधरन दिग्दर्शित " मिशन इम्पॉसिबल" या माहितीपटास राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांक मिळाला.

पी. एम. शहा फाउंडेशनच्या वतीने पुणे येथील एनएफडीसी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे दोन दिवसीय आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उदघाटन स्मिता पाटील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे संस्थापक, संचालक डॉ.अभिजीत वैद्य यांच्या हस्ते झाले. लघुपट व माहितीपटांच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने माहितीपट व लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवात तयार केलेल्या आरोग्यविषयक लघु चित्रपटांचे या महोत्सवात सादरीकरण करण्यात आले. या महोत्सवात भारत,जर्मनी,अमेरिका,बांगलादेश, पाकिस्तान,इंग्लंड, फ्रान्स,फिलिपाईन्स, सिंगापूर, लंडन, ऑस्ट्रेलिया आदि देशातील तज्ञ डॉक्टरांनी स्वच्छता, फार्मसी, कोविड,मानसिक आरोग्य,बालकांचे आरोग्य ,कर्करोग, स्त्रीयांचे आरोग्य,लैंगिक आरोग्य व समस्या,अवयवदान,अपंगत्व,ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य समस्या, सर्पदंश आदी विषयावर लघुपट व माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले होते.

नारायणगाव येथील विघ्नहर मेडिकल फाउंडेशनचे जागतिक विषबाधा व सर्पदंश तज्ञ डॉ. सदानंद राऊत,डॉ. पल्लवी राऊत यांनी विषारी सर्पदंशावर तयार केलेल्या मिशन इम्पॉसिबल" या माहितीपटास राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक मिळाले. प्रसिद्ध फिल्ममेकर वीरेंद्र वळसंगकर, महोत्सव संचालक चेतन गांधी यांच्या हस्ते डॉ.सदानंद राऊत व डॉक्टर पल्लवी राऊत यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.या वेळी शहा फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेला 'स्कूल सॅनिटेशन प्रोग्रॅम ' यशस्वीपणे राबविलेल्या पाच शाळांचा विशेष सन्मान वळसंगकर यांच्या हस्ते करण्यात आला. परीक्षक विनय जवळगीकर, रश्मी आगरवाल यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. सदानंद राऊत ( जागतिक विषबाधा व सर्पदंशतज्ञ) : विषारी सर्पदंश झालेल्या रुग्णांवर मागील तीस वर्षापासून उपचार करत आहे.विषारी सर्पदंश झालेल्या सुमारे बारा हजार रुग्णांना जीवदान दिले आहे. नाग, मण्यार, फुरसे, घोणस या अतिविषारी सर्पदंशाची लक्षणे भिन्न आहेत. मागील तीस वर्षाच्या अनुभवातून मिळालेल्या माहितीच्या आधारे शून्य सर्पदंश प्रकल्प तयार करून राज्य शासनाला सादर केला आहे. सर्पदंशावर आधारित 32 मिनिटांचा माहितीपट तयार केला आहे. या माध्यमातून विषारी सर्पदंशाच्या जाती, लक्षणे, उपचार आदी बाबतची माहिती देऊन प्रबोधन करण्यात आला आहे. या माहितीपटाला राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक मिळाल्याने या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

वीरेंद्र वळसंगकर( प्रसिद्ध फिल्ममेकर ): कोणताही विषय थेटपणे आणि नेमक्या पद्धतीने मांडता येणे, ही लघुपट, माहितीपटांची खरी ताकद आहे.लघुपट, माहितीपट तुलनेने कमी खर्चात तयार होतात, तसेच समाजापर्यंत प्रभावीपणे आशय पोचवतात. डॉ. राऊत दांपत्याने शून्य सर्पदंश हा महत्वाकांक्षी व अवघड प्रकल्प ग्रामीण भागात यशस्वीपणे राबविला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com