

‘एमआयटी’चे
बारावी परीक्षेत यश
पंढरपूर, ता. ८ : वाखरी येथील माईर्स एमआयटी पुणे संचालित विश्वशांती गुरुकुल ज्युनिअर कॉलेजचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के व विज्ञान शाखेचा निकाल ९७.८२ टक्के लागला आहे.
वाणिज्य शाखेतील पियुष साळुंखे याने ९६ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याने अकाउंट्स व गणित विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तर सायली ढेकळे हिने ९३.६७ टक्के गुण मिळवत द्वितीय तर तन्वी खपाले ८९ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे. याशिवाय इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये पारस शेठ ८७.१७ टक्के, सोहम बहुरूपी ८७ टक्के, प्रवीण चौधरी ८७ टक्के, ओंकार लगड ८६.३३ टक्के आणि परिणिता आवताडे ८६ टक्के यांनीही विशेष प्रावीण्य मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.