

Global Recognition: MIT-ADT University Achieves Prestigious DASCA Accreditation
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : एमआयटी आर्ट,डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाला (एमआयटी-एडीटी) डेटा सायन्स कौन्सिल ऑफ अमेरिका (DASCA) यांचे मानांकन प्राप्त झाले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा सायन्स क्षेत्रातील उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.या मानांकनासह विविध एआय व डेटा सायन्स अभ्यासक्रमांसाठी ‘डास्का’ मान्यता मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरण्याचा मान ‘एमआयटी-एडीटी’ला मिळाला आहे.