लोणी येथे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल हिसकावला

लोणी येथे पत्ता विचारण्याच्या 
बहाण्याने मोबाईल हिसकावला
Published on: 

लोणी काळभोर, ता. ६ : रुग्णालयाचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एमआयटी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एका विद्यार्थ्याच्या हातातील २४ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून तिघे चोरटे दुचाकीवरून पसार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य प्रल्हाद ढगे (वय २०, रा. राहिंजवस्ती, लोणी काळभोर, मूळ रा. शिरसवाडी, जि. जालना) हा एमआयटी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. मंगळवारी (ता. ३) रात्री अकराच्या सुमारास मित्राच्या वसतिगृहातून स्वतःच्या खोलीकडे पायी जात असताना एमआयटीच्या प्रवेशद्वाराजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याला थांबवले. रुग्णालय कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर त्याने समोरच विश्वराज हॉस्पिटल असल्याचे सांगितले. याचवेळी दुचाकीवर मधल्या सीटवर बसलेल्या तरुणाने त्याच्या हातातील सिल्व्हर रंगाचा रेडमी एमआय ११ प्राइम मोबाईल अचानक हिसकावला. आदित्य याने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हातातील दुसरा मोबाईल खाली पडला. मात्र, तिघांनी दुचाकी वेगाने पळवून घटनास्थळावरून धूम ठोकली.
या घटनेनंतर आदित्य याने एमआयटीच्या सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. तसेच, ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली; मात्र चोरटे हाती लागले नाहीत. याप्रकरणी आदित्य याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.