हवेत गोळीबार करुन त्याचा व्हिडीओ काढणं आलं अंगलट; माजी सैनिकासह दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Shirur Crime: बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कसेकर यांनी काडतूसांनी भरलेले पिस्तुल राजेश लंघे यांच्याकडे दिले. त्यावेळी त्यांनी व त्यांच्या पत्नी स्वाती यांनी एकापाठोपाठ एक हवेत गोळीबार केला.
हवेत गोळीबार करुन त्याचा व्हिडीओ काढणं आलं अंगलट; माजी सैनिकासह दाम्पत्यावर गुन्हा दाखल
Updated on

शिरूर: माजी सैनिकाच्या पिस्तुलमधून हवेत गोळीबार करून त्याचा व्हिडिओ काढणे मुंबई येथील दांपत्याच्या अंगलट आले आहे. सविंदणे (ता. शिरूर) हे मूळ गाव असलेल्या दाम्पत्याने, यात्रेच्या निमीत्ताने गावी आले असताना हौसेखातर हा जीवघेणा खेळ खेळल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. बुधवारी (ता. १) रात्री साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होऊनही पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com