MIT University Pune : लोणी काळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनी १४ तास लिफ्टमध्ये अडकली, गुरुवारी पहाटे सुखरूप सुटका

MIT University Student Trapped in Lift for 14 Hours in Pune : लोणी काळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात वीजपुरवठा खंडित झाल्याने १९ वर्षीय विद्यार्थिनी लिफ्टमध्ये अडकली. तब्बल १४ तासांनंतर तिची सुखरूप सुटका झाली; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले.
MIT University Student Trapped in Lift for 14 Hours in Pune

MIT University Student Trapped in Lift for 14 Hours in Pune

Sakal

Updated on: 

लोणी काळभोर : नामांकित शैक्षणिक संस्थेचा लौकिक मिरवणाऱ्या लोणी काळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी लिफ्टमध्ये प्रवेश केलेली १९ वर्षीय विद्यार्थिनी तब्बल १४ तास लिफ्टमध्ये अडकून पडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १९) उघडकीस आली. बुधवारी (ता. १८) दुपारी साडेतीनच्या सुमारास लिफ्टमध्ये अडकलेली विद्यार्थिनी गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास सुखरूप बाहेर आली. या काळात विद्यार्थिनीला अन्न-पाण्याविना बंदिस्त लिफ्टमध्ये राहावे लागले. तर दुसरीकडे मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या पालकांनी रात्रभर शोधाशोध केली. या प्रकारामुळे एमआयटीच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...