
PCM Protest
Sakal
पुणे/खराडी : वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आज (ता. ७) आमदार बापू पठारे यांनी महापालिकेवर मोर्चा काढला. या वेळी त्यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन देऊन मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी केली. या आंदोलनात मतदारसंघातील नागरिकही सहभागी झाले होते.