Former MLA Ashok Pawar and MLA Dnyaneshwar Katke
sakal
शिरूर - स्थावर मालमत्तेच्या तूलनेत जिल्ह्यातील श्रीमंत, सहकारातील महत्वाची व राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची शेतकरी संस्था असलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरील वर्चस्वासाठी ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके व अशोक पवार हे आजी - माजी आमदार पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वामुळे महायुतीचा पॅनेल प्रबळ झाला असला; तरी भारतीय जनता पक्षाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जुने कार्यकर्ते अशोक पवारांच्या मागे गेल्याने महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलही तूल्यबळ झाला आहे. दोन्ही बाजूंच्या तालेवार व ताकदवान नेत्यांच्या उमेदवारीने ही निवडणूक कमालीची चुरशीची झाली आहे.