Maharashtra Exam Scam : पेपरफुटी ही आता अपवाद नसून वारंवार घडणारी घटना ; आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका

पेपरफुटी, डमी उमेदवार आणि भरतीतील गैरप्रकारांवरून आव्हाड यांचा सरकारवर निशाणा; कायदा व प्रशासनावरील जनविश्वास डळमळीत झाल्याचा आरोप
MLA Jitendra Awhad criticizes Maharashtra government over recurring paper leak incidents

MLA Jitendra Awhad criticizes Maharashtra government over recurring paper leak incidents

sakal
Updated on

ठाणे : महाराष्ट्रात आता कोणतीही गोष्ट सुरक्षित राहिलेली नाही. राजकारणात लोकप्रतिनिधींच्या पक्षांतराच्या घटना सुरूच आहेत, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षा देखील वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. पेपरफुटी ही आता अपवाद नसून वारंवार घडणारी घटना बनली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com