मी वहिनी आहे ना.. मग थेट माझ्याशी बोला (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

पुणे : ''घरामध्येही जे कोणाशीही मनमोकळे बोलू शकत नाहीत, ते वहिनीला सगळ सांगतात. त्याच प्रमाणे तुम्ही मला वहिनी म्हणता, पक्षाचे काम करताना काही गोष्टी आजूबाजूला न बोलता थेट मला बोला, यातून निम्मे वाद संपतील अशा सूचना भाजपच्या नवनियुक्त शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. दरम्यान मिसाळ या पदभार स्विकारताना महापालिकेतील सर्वच पदाधिकाऱ्यांनी दांडी मारलेली होती. पर्वती मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी यावेळी शक्तीप्रदर्शन केले. 

भाजपचे मावळते शहराध्यक्ष व नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले यांनी या पदाची सुत्रे माधुरी मिसाळ यांच्याकडे सन्मान येथील शहर कार्यालयात मंगळवारी सुपूर्त केली. यावेळी सरचिटणीस गणेश बीडकर, नगरसेवक मुरलीधर मोहळ, विभागीय संघटक रवी अनासकर आदी उपस्थित होते. 

योगेश गोगावले यांनी संघटनेचे काम कसे करावे याचा नवा पॅटर्न निर्माण केला आहे. भाजपमध्ये संघटनेत बदल केले जातात, त्यामुळे कोणाला काढले, कोणाला ठेवले याला फार महत्व देऊ नका, ही एक प्रक्रिया आहे. हे पद मिरविण्यासाटी नसून, माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. त्यामुळे तुमच्या सहकार्याची गरज आहे., असे मिसाळ यांनी सांगितले. 

विधानसभेत भाजप आणि भाजप 
विधानसभा निवडणूकीमध्ये भाजप शिवसेना युती होणार असे सांगितले जात असले तरी नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विधानसभेसाठी सर्वोतोपरी भाजप आणि भाजपचा नारा देऊयात. ही निवडणूक जिंकूयात असे स्पष्टपणे सांगितले. पत्रकारांशी बोलताना मिसाळ यांनी युतीचा निर्णय दोन्ही पक्षाचे नेते घेतील. मी विधानसभा लढवणार आहे, संघटनेचे पद आल्यानंतर रावसाहेब दाणवे, देवेंद्र फडणीस यांनीही निवडणूक लढवली होती, असे सांगितले. तर गणेश बीडकर यांनीही कसब्यातून निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखविली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Madhuri Misal as Pune city BJP president told Activist can talk to her freely