Pune News : आळेफाटा येथे उद्या आमदार खासदार यांच्या उपस्थितीत भव्य रस्तारोको आंदोलन

केंद्र सरकारने कांदा निर्णयातीवर ४० % शुल्क लागू केल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने आळेफाटा (ता.जुन्नर) येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करणार
mla mp political leaders rasta roko andolan in alephata over onion 40 percent export duty pune
mla mp political leaders rasta roko andolan in alephata over onion 40 percent export duty pune esakal

- राजेश कणसे

आळेफाटा : केंद्र सरकारने कांदा निर्णयातीवर ४० % शुल्क लागू केल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने आळेफाटा (ता.जुन्नर) येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करणार आहे. उद्या मंगळवार दि. २२ रोजी सकाळी साडेनऊ वाजता आळेफाटा चौकामध्ये हे आंदोलन असणार आहे.

या आंदोलनामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके,तालुक्यातील शेतकरी संघटना, जुन्नर तालुका शिवसेनाप्रमुख माऊली खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, माजी आमदार बाळासाहेब दांगट,

विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर शाम माळी,प्रसन्नअण्णा डोके यांसह अनेक नेते व शेतकरी उपस्थित असणार आहेत. या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन आमदार अतुल बेनके तसेच खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com