भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि पत्नीस कोरोना संसर्ग

विजय जाधव
Monday, 26 October 2020

भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांना आणि त्यांची पत्नी स्वरुपा थोपटे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

भोर ः भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांना आणि त्यांची पत्नी स्वरुपा थोपटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द आमदार संग्राम थोपटे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या संपर्कात आलेल्या सर्व पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. कोरोनावर मात करुन पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होणार असल्याचा विश्वासही आमदार संग्राम थोपटे यांना व्यक्त केला आहे.

आमदार थोपटे यांनी सोशल मिडीयावर दाखल 
केलेली पोस्ट पुढीलप्रमाणे :
 'गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघात कामासंबंधी दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे, मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली. ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याच सोबत माझ्या पत्नीचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला असून, आम्ही ठणठणीत असून, उपचार घेत आहोत. आपण काळजी करू नये. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या 
सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल 
होईन.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान आमदार थोपटे यांची कोरोनापासून मुक्तता व्हावी यासाठी भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यातील कॉग्रेसच्या पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी देवाकडे साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sangram Thopte Corona Positive