
पुणे : मुळशी तालुक्यातील सहा गावे पुन्हा पौड पोलिस ठाण्याला जोडावीत, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी विधानसभेत केली. याबाबत विधानसभेत मांडेकर म्हणाले, ‘‘भूगाव, भुकूम, पिरंगुट, लवळे, चांदे आणि नांदे आदी सहा गावे गेल्या सहा महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड आयुक्तालयांतर्गत बावधन पोलिस ठाण्याला जोडली आहेत.