सराईत श्रीशैल हुळ्ळे सापडेना

सराईत श्रीशैल हुळ्ळे सापडेना
Published on

(लोगो : आमदारांना जीवे मारण्याची धमकी)

पोलिसांची चार पथके रवाना,
तरी सराईत श्रीशैल हुळ्ळे सापडेना

मोबाईल बंद करून पसार; अटकेतील प्रभाकर म्हणतोय, ‘माझा काही संबंध नाही’

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ११ : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळी घालून मार, तुला पैसे देतो, असे म्हणणारा दक्षिण सोलापुरातील वडगावचा श्रीशैल हुळ्ळे अद्याप फरार आहे. त्याला शोधण्यासाठी सदर बझार पोलिसांची दोन आणि शहर गुन्हे शाखेची दोन पथके रवाना झाली आहेत.
आमदार कल्याणशेट्टी शुक्रवारी (ता. ७) दुपारी पावणेचारच्या सुमारास सोलापूर शहरातील महावीर चौकातील प्युमा शोरूममध्ये कपडे खरेदीसाठी आले होते. त्यावेळी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार श्रीशैल हुळ्ळे व त्याचा चालक प्रभाकर फुलारी तेथे गेले. आमदार कल्याणशेट्टी यांच्या गाडीचा चालक आनंद स्वामीराव सुरवसे यास भेटून, ‘तुला पैसे देतो, तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, मी पुढचे बघतो,’ असे श्रीशैल म्हणाला. तर, ‘साहेब काय म्हणतात ते नीट ऐकून घे, यात तुझाच फायदा आहे,’ असे प्रभाकर म्हणाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आमदार कल्याणशेट्टी यांच्या चालकाने या प्रकरणी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर काही तासांत पोलिसांनी प्रभाकरला जेरबंद केले. त्याची पोलिस कोठडी उद्या (बुधवारी) संपणार असून, त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. आमदाराला मारण्याची भरदिवसा धमकी देणारा सराईत गुन्हेगार फरार असल्याने पोलिसही रात्रंदिवस मेहनत करून त्याचा शोध घेत आहेत; पण तो अजूनही सापडलेला नाही. त्यामुळे मंगळवारी (ता. ११) त्याच्या शोधासाठी आणखी दोन पथके वाढविण्यात आली आहेत.

चौकट
तडीपारीचा आदेश तीनदा मोडला
मारामारीसह अन्य गुन्ह्यांतील सराईत आरोपी श्रीशैल हुळ्ळे याच्यावर वळसंग पोलिसांच्या प्रस्तावानुसार पोलिस अधीक्षकांनी तडीपारीची कारवाई केली. तरीदेखील, त्याने दोनदा तो आदेश मोडला. आता पुन्हा तो तडीपार असतानाही सोलापूर शहरात वावरत होता. त्यामुळे आमदाराला धमकी दिल्याच्या गुन्ह्यात हुळ्ळेविरुद्ध तडीपारीचा आदेश भंग केल्याचे कलम वाढविले जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com