चाकण - ‘मी आमदाराचा पुतण्या आहे, येथूनच जाणार,’ असे म्हणून ‘नो एन्ट्री’मधून जाण्याचा हट्ट धरून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या मयूर काळे (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) याच्यावर चाकण (ता. खेड) पोलिसांनी गुन्हा दाखल केला.