esakal | मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात टाकला कचरा
sakal

बोलून बातमी शोधा

वानवडी - वानवडी-कोंढवा सहाय्यक महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी कचरा टाकला.

कोंढवा, रामटेकडी आणी वानवडी भागातील कचरा महापालिकेच्या घनकचरा विभागाच्यावतीने वेळेत व नियमितपणे उचलला जात नसल्याने वानवडी- कोंढवा सहाय्यक महापालिका आयुक्त किशोरी शिंदे यांच्या कार्यालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कचरा टाकण्यात आला.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात टाकला कचरा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हडपसर - कोंढवा, रामटेकडी आणी वानवडी भागातील कचरा महापालिकेच्या घनकचरा विभागाच्यावतीने वेळेत व नियमितपणे उचलला जात नसल्याने वानवडी- कोंढवा सहाय्यक महापालिका आयुक्त किशोरी शिंदे यांच्या कार्यालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कचरा टाकण्यात आला. नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हा कचरा टाकला. याप्रसंगी अमोल सिरस, गणेश बाबर, सतिश शिंदे, रोहन गायकवाड, योगेश बाबर, अशोक पवार, शुभम मुळीक, रोनक बाबर, नारायण स्वामी, रविंद्र कुंभार यांसह मोठया संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत नगरसेवक बाबर म्हणाले, कोंढवा, वानवडी, रामटेकडी भागातील कचरा रोजच्या रोज उचलला जात नाही. चौका चौकात कच-याचे ढिग साचले आहेत. महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या उपआयुक्तांना याबाबत दोन वेळा निवेदन दिले व प्रभाग समितीमध्ये अनेकदा हा विषय मांडल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तातडीने कच-याबाबत नियोजन न झाल्यास महापालिका आयुक्तांच्या घरात आणि कार्यालयात कचरा टाकण्यात येईल.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top