पुणे - शहर व परिसरातील राष्ट्रीय आणि खासगी बॅंकांत खातेदारांशी मराठी भाषेत संवाद साधावा, कागदपत्रे मराठीत असावीत आणि बॅंकिंग सेवा मराठी भाषेत उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ९ बॅंकांना गुरुवारी निवेदन दिले. मराठी भाषा ही राजभाषा असून महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्यामुळे बॅंकांत तिचाच वापरा करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असेही त्यात म्हटले आहे.