'आमदाराचे काम चंद्रकांत पाटील यांना समजत नाही'

मंगेश कोळपकर
Monday, 28 October 2019

निवडणुकीनंतर वैयक्तिक प्रलोभनांची पूर्तता करण्याचा नवा पायंडा भाजपचे नेते पाडत आहेत. नैतिकतेची टिमकी वाजवणाऱ्या भाजप हा नवा निर्लज्य अवतार आहे. स्थानिक वस्ती पातळीवर भाजपचे नगरसेवक हे प्रलोभन पूर्तीचे एजंट असल्याने हे काम तेच करणार आहेत, असेही किर्दत यांनी म्हटले आहे. 

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील किमान दहा हजार महिलांना भाऊबीज म्हणून साड्या वाटण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपक्रमला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. 

या बाबत मनसेचे प्रमुख कार्यकर्ते अनिल शिदोरे ट्विटद्वारे म्हणाले, की 'पाटील यांना आमदारांचे काम काय आहे, हेच माहिती नाही. त्या मुळे ते असे उद्योग करत आहेत. 
मनसेचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत म्हणाले, ''चंद्रकांत पाटील यांचा साडी वाटप कार्यक्रम  हे निवडणुकीमधील आमिषच असून निवडणुकीदरम्यान भेटवस्तू वाटपच्या ऐवजी निवडणूकीनंतर भेटवस्तू वाटप करून आचारसंहिता नियमातून पळवाट काढण्याचा प्रकार आहे.'' भेटवस्तू वाटप हे मतदानाशी संबंधितच असल्याने निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी अशी मागणी आम्ही  करीत आहोत. 

निवडणुकीनंतर वैयक्तिक प्रलोभनांची पूर्तता करण्याचा नवा पायंडा भाजपचे नेते पाडत आहेत. नैतिकतेची टिमकी वाजवणाऱ्या भाजप हा नवा निर्लज्य अवतार आहे. स्थानिक वस्ती पातळीवर भाजपचे नगरसेवक हे प्रलोभन पूर्तीचे एजंट असल्याने हे काम तेच करणार आहेत, असेही किर्दत यांनी म्हटले आहे. 

चंद्रकांत पुण्याचे पालकमंत्री असल्याने त्यांना महिलांना भाऊबीज घ्यायचीच असेल तर सर्व पुणेकर महिलांना द्यावी म्हणजे आपोआप त्यांचे प्रेम लाखो त्रस्त महिलांना कळेल आणि पुढे या मुली बहिणींचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना खरोखर काय हवे आहे हे पण समजावून घ्यावे, असेही  किर्दत यांनी म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS and AAP targets Chandrakant Patil on distribute sarees in Kothrud Pune