चंद्रकांत पाटील, किशोर शिंदे कोथरूडमध्ये आमनेसामने...मग काय घडलं ?

विनायक बेदरकर
Monday, 21 October 2019

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोथरूड मतदारसंघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसेचे उमेदवार किशोर शिंदे आमने-सामने आहेत. कोथरूड येथील मतदान केंद्रावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार चंद्रकांत पाटील व मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांची भेट झाली यावेळी त्यांनी एकमेकांची मनमोकळ्या गप्पा मारून शुभेच्छा दिल्या.

​पुणे : कोथरूडमधील रंगतीत आज मयूर कॉलनीतील मतदान केंद्रावर भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील आणि मनसे उमेदवार किशोर शिंदे यांची भेट झाली. यावेळी पाटील यांनी शिंदे यांना भाजपात येण्याची ऑफर दिली. तर मी मनसेतच बरा असल्याचे सांगत शिंदे यांनी विषय आवरता घेतला.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोथरूड मतदारसंघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसेचे उमेदवार किशोर शिंदे आमने-सामने आहेत. कोथरूड येथील मतदान केंद्रावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार चंद्रकांत पाटील व मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांची भेट झाली यावेळी त्यांनी एकमेकांची मनमोकळ्या गप्पा मारून शुभेच्छा दिल्या.

‎या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना मनमोकळेपणे दाद दिली.  राज्यात महायुतीला अडीचशे जागा मिळतील तर मतदारसंघातून 160000 च्यापुढे मताधिक्य घेऊन विजयी होईल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

या भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी किशोर शिंदे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली मात्र शिंदे यांनी कोथरूड मधील भाजपाच्या निष्ठावान त्यांना न्याय द्या मी मनसेतच  बरा असे सांगून विषय संपवला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS candidate kishor Shinde meets Chandrakant Patil in Kothrud Pune