Vidhan Sabha 2019 : राज ठाकरेंचे अखेर ठरलं; पुण्यात बुधवारी 'लाव रे...'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 October 2019

विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यासाठी मनसेचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासन, पोलिस आयुक्तांकडे टिळक चौक, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, स. प. महाविद्यालय आदी ठिकाणी परवानगी मागितली होती.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या बुधवारी (ता. 9) सायंकाळी सहा वाजता बाजीराव रस्त्यावरील नातूबागेच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. पोलिसांची परवानगी मिळो अथवा न मिळो, सभा तेथेच घेण्याचा निर्धार मनसेने व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यासाठी मनसेचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासन, पोलिस आयुक्तांकडे टिळक चौक, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, स. प. महाविद्यालय आदी ठिकाणी परवानगी मागितली होती. परंतु, ती अद्याप मिळालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर नातूबागेच्या मैदानावर सभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती मनसेचे उपनेते बाबू वागस्कर यांनी दिली.

ते म्हणाले, "राजकीय पक्षांना सभा घेण्यासाठी मैदान उपलब्ध करून देणे ही जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. परंतु, त्यांच्यात आणि जिल्हा निवडणूक आयोगामध्ये विसंवाद आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना मैदाने मिळण्यावर अडचण येत आहे. परंतु, आता काहीही होवो, मनसे नातूबागेच्या मैदानावर सभा घेणार आहे.'' ठाकरे यांची हडपसर आणि कोथरूडसाठीची सभा 16 ऑक्टोबरला होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS chief Raj Thackeray campaign rally in Pune for Maharashtra Vidhan Sabha 2019