मनसेच्या रुपाली पाटील बारामतीत; घेतली पवारांची भेट

सागर आव्हाड
Monday, 28 October 2019

स्वकीयांनी ताकत दिली नसली तरी जी ऊर्जा पवार साहेबांनी दिली. ती प्रेरणादायी आहे. लेक म्हणूण त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. हरता हरता जिंकता येत हे पवार यांच्याकडून शिकायला मिळालं.

बारामती : पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) महिला नेत्या रुपाली पाटील यांनी आज (सोमवार) दिवाळी पाडव्यानिमित्त बारामतीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

बारामतीतील गोविंदबागेत आज पवार कुटुंबीय राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेत असताना मनसेच्या रुपाली पाटील यांनीही शरद पवार व अजित पवार यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी रुपाली पाटील म्हणाल्या, की स्वकीयांनी ताकत दिली नसली तरी जी ऊर्जा पवार साहेबांनी दिली. ती प्रेरणादायी आहे. लेक म्हणूण त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. हरता हरता जिंकता येत हे पवार यांच्याकडून शिकायला मिळालं. मी त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. यापूर्वी मी कधी बारामतीमध्ये आले नाही. आजचा उत्साह पण एक ऊर्जा मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS leader Rupali Patil meet Sharad Pawar in Baramati