"सावध राहा रुपेश..."; वसंत मोरेंच्या मुलाला धमकी

वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.
Vasant  More
Vasant MoreSakal

पुणे : मनसे नेते वसंत मोरे (MNS Leader Vasant More) यांच्या मुलाला धमकी दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

(Vasant More News)

एका कार्यक्रमाच्या दरम्यान अज्ञात इसमाने रुपेश मोरे याच्या गाडीवर चिठ्ठी ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये रूपेशला धमकी देण्यात आली आहे. "सावध राहा रुपेश" असा उल्लेख चिठ्ठीत आढळला असून या घटनेनंतर वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

Vasant  More
"...अन् मी त्यांचा दीर झालो"; काय घडलं वसंत मोरेंसोबत?
वसंत मोरे यांच्या मुलाला अज्ञातांकडून धमकी
वसंत मोरे यांच्या मुलाला अज्ञातांकडून धमकीसकाळ

दरम्यान मनसे नेते वसंत मोरे हे पुण्यातील प्रसिद्ध नेते आहेत. सामाजिक कामं आणि अडल्या नडल्या लोकांना मदत करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मध्यरात्री एका महिलेला मदत केली होती. त्यानंतर त्यांचे ते ट्वीट व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी मध्यरात्री महिलेल्या केलेल्या मदतीच्या घटनेनंतर दोन दिवसांतच त्यांच्या मुलाला अज्ञातांकडून धमकी देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com