Vidhan Sabha 2019 : अखेर मनसेला पुण्यात मतदारसंघ मिळाला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोथरुड विधानसभा मतदारसंघ देण्याचे ठरले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी सुचित केले आहे.

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोथरुड विधानसभा मतदारसंघ देण्याचे ठरले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी सुचित केले आहे.

काँग्रेसला तशी सूचनाही दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसकडे सुद्दा कोथरुड विधानसभा मतदारसंघासाठी सक्षम उमेदवार नसल्यामुळे आघाडीच्या कोट्यातून मनसेला जागा देण्याचा निर्णय झाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.

दरम्यान, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सामील होणार की नाही यावर सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघ मनसेला सोडून मनसे आघाडीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जवळपास निश्चित करण्यात आल्याचे यातून स्पष्ट होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns may fight kothrud vidhan sabha seats in maharashtra assembly election