मनसेची ही भूमिका योग्य नाही- शरद पवार

ज्ञानेश सावंत 
रविवार, 28 जुलै 2019

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलानं आघाडीत करण्याचा हालचाली सुरू असतानाच "ईव्हीएम'संदर्भातील मनसेच्या भूमिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच बोट ठेवले. निवडणुकीवर बष्हिकार टाकण्याची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका योग्य नसल्याचे सांगत, मनसेला आघाडीत घेण्याबाबत स्पष्ट बोलणे त्यांनी टाळले. 

पुणे : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलानं आघाडीत करण्याचा हालचाली सुरू असतानाच "ईव्हीएम'संदर्भातील मनसेच्या भूमिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच बोट ठेवले. निवडणुकीवर बष्हिकार टाकण्याची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका योग्य नसल्याचे सांगत, मनसेला आघाडीत घेण्याबाबत स्पष्ट बोलणे त्यांनी टाळले. 

निवडणुकीतील "ईव्हीएम' हटविण्यावरून विरोधक आक्रमक झाले आहे. त्यात, राज यांनी "युपीए'च्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्याचवेळी आगामी विधानसभा निवडणुकीत राज यांना सोबत घेण्याबाबत कॉंग्रेस अनुकूल असल्याचे स्पष्ट आहे. त्यानुसार दोन्ही कॉंग्रेस आणि मनसेच्या नेत्यांत प्राथमिक चर्चाही झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, "ईव्हीएम'ला प्रचंड विरोध करीत, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका राज यांच्यासह मनसेच्या अन्य नेत्यांची आहे. त्यावर दोन्ही कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. या पार्श्‍वभूमीवर मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात विचारले असता, पवार यांनी मनसेच्या भूमिकेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली. बहिष्काराची भूमिका पटली नसल्याचेच सांगितले. 

पवार म्हणाले, ""सर्वच विरोधी राजकीय पक्ष "ईव्हीएम'च्या विरोधात आहे. त्याला विरोध करणे योग्य आहे. मात्र, निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याची भूमिका मनसेला घेतली. त्यावर चर्चा झाली. पण तसे शक्‍य नाही.'' 

""राज्यातील 288 पैकी 240 जागांवर दोन्ही कॉंग्रेसचे एकमत झाले आहे. उर्वरित 48 जागांबाबत चर्चा सुरू असून, त्यावर तोडगा काढला निघेल. नव्या पिढीला सोबत घेऊन निवडणुका लढविण्यात येतील,'' असे पवार यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Partys role is not right says Sharad Pawar