Raj ThackerayESakal
पुणे
Pune Election: पुण्यात मनसे स्वबळावर? राज ठाकरे लागले कामाला, पक्षात मोठे फेरबदल; ९ जूनला ठाकरेंचा दौरा
MNS Gears Up for Pune Municipal Elections: मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ९ जून रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात ते सर्व पदाधिकाऱ्यांची पुण्यात एक मोठी बैठक घेणार आहेत.
Raj Thackeray MNS: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुण्यात जोरदार तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने पुण्यातील शहर कार्यालयात पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता, ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.