
राज ठाकरे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करीत जमीर काझी यांचा राजीनामा
राज ठाकरे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करीत जमीर काझी यांचा राजीनामा
दौंड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी व त्यानंतर औरंगाबाद येथे केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त करीत पुणे जिल्ह्यातील दौंडचे मनसे शहराध्यक्ष जमीर काझी यांनी राजीनामा दिला आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर यांच्याकडे जमीर सय्यद यांनी राजीनामा सादर केला आहे. राजसाहेब ठाकरे यांची भोंगे संबंधी भुमिका चुकीची असल्याचे सांगत जे पूर्वीपासून चालू आहे ते चालू राहिले पाहिजे. त्याचबरोबर १ मे रोजी औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी अजान सुरू असताना केलेले विधान मुस्लिम समाजाची भावना दु: खविणारी आहे.
समाजातील ज्येष्ठांसह सर्वांबरोबर चर्चा केल्यानंतर आणि समाजाकडून दबाव वाढल्याने राजीनामा दिल्याचे जमीर सय्यद यांनी सांगितले. सलग १६ वर्षे मनसे मध्ये सक्रिय असलेले जमीर सय्यद यांनी मनसे वाहतूक सेनेचे शहराध्यक्षपद, मनसे एसटी कामगार सेनेचे पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. मागील ३ वर्षांपासून जमीर सय्यद दौंड शहराध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. जमीर सय्यद यांचे बंधू दहा वर्षे दौंड नगरपालिकेचे सदस्य होते. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर यांनी सदर राजीनामा मिळाला नसल्याचे सांगितले. सामाजिक बहिष्काराच्या भीतीने राजीनामे दिले जात असल्याचे मत अॅड. सुधीर पाटसकर यांनी व्यक्त केले.
Web Title: Mns Raj Thackeray Removed Loudspeaker On Mosques Statement Made At Aurangabad Jamir Qazi Resigns Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..