पक्ष कार्यालयात जाणार नाही म्हणणारे वसंत मोरे अखेर मनसे कार्यालयात दाखल

raj thackeray vasant more
raj thackeray vasant moreSakal
Updated on

पुणे : आज पुण्यात मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला सुरूवात झाली. यावेळी पुण्यातील नगरसेवक आणि मनसे नेते वसंत मोरे आज शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदाच शहर पक्ष कार्यालयात हजर झाले होते. शहराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर वसंत मोरे पक्ष कार्यालयात गेले नव्हते. मात्र आज ते पक्ष कार्यालयात दिसल्याने त्यांची नाराजी दूर करण्यात राज ठाकरे यांना यश आल्याचं बोललं जात आहे.

(MNS Vasant More Latest News)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यात मनसे सदस्य नोंदणीला सुरूवात झाली यावेळी वसंत मोरे उपस्थित होते. दरम्यान, शहराध्यक्ष पदावरून तडका फडकी हटवल्यानंतर वसंत मोरे काही काळ पक्षाबद्दल नाराज असल्याचं त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून स्पष्ट झालं होतं. त्यामुळे जोपर्यंत राज ठाकरे सांगणार नाहीत तोपर्यंत पक्ष कार्यालयात जाणार नाही अशी भूमिका मोरे यांनी घेतली होती. मात्र आता राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर वसंत मोरे ऍक्टिव्ह झाले असून ते पहिल्यांदा मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात हजर राहिले आहेत.

raj thackeray vasant more
पुण्यात मनसे सदस्य नोंदणीला जोरदार सुरूवात; राज ठाकरे काय म्हणाले वाचा

दरम्यान, राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये त्यांनी मशिदीवरील भोंग्याच्या प्रश्नाला हात घातला होता. त्यानंतर राज्यभर वातावरण पेटलं होतं. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद देशभर पसरल्यानंतर पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी आपल्या प्रभागातील मशिदीवरील भोंगे हटवण्यास विरोध केला होता. त्यानंतर त्यांना पक्षाकडून मनसे शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं होतं. साईनाथ बाबर यांना मनसे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर वसंत मोरे नाराज असल्याचं बोललं जात होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Marathi News Esakal
www.esakal.com