Vidhan Sabha 2019 : पुण्यातल्या सर्व जागांवर मनसेचे इंजिन धावणार; हे असणार उमेदवार

ज्ञानेश्‍वर बिजले 
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

पुणे शहरातील आठही मतदारसंघांतून मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मुंवईत आज (सोमवार) निवडणुकीबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. 

पुणे : पुणे शहरातील आठही मतदारसंघांतून मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मुंवईत आज (सोमवार) निवडणुकीबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. 

हडपसरमधून नगरसेवक वसंत मोरे, कसबापेठेतून माजी नगरसेविका रुपाली पाटील, पर्वतीतून जयराज लांडगे यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. कोथरुडमध्ये माजी नगरसेवक किशोर शिंदे, पक्षाचे सरचिटणीस हेमंत संभूस, तर शिवाजीनगर मतदारसंघातून अंजनीय साठे, सुहास निम्हण, रणजीत शिरोळे इच्छुक आहेत. खडकवासला मतदारसंघातून चंद्रकांत गोगावले यांच्यासह आणखी दोघेजण इच्छुक आहेत. वडगाव शेरीमध्येही इच्छुक असलेल्या दोघातिघांतून एकाची निवड करण्यात येणार असल्याचे मनसेच्या सुत्रांनी सांगितले. 

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांची पुण्यातील आठही मतदारसंघांतून सुमारे पावणेदोन लाख मते मिळविली होती, तर शिवसेनेच्या उमेदवारांनी एकूण अडीच लाख मतांच्या आसपास मते पडली होती. यंदा एखाद्या मतदारसंघाचा अपवाद वगळल्यास, शिवसेना पुणे शहरात निवडणुकीच्या रिंगणात नाही. त्याचा फायदा मनसेच्या उमेदवारांना होऊ शकतो.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS will Fight on all Constituency in pune